शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

भारतीय लष्कराचे जय भारत हॉट एअर बलून येणार अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:28 PM

एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दोन ‘हॉट एअर बलून’चे शनिवार, १ डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन होणार आहे.

अकोला : भारतीय लष्कराचे साहसी कौशल्य बघण्याची संधी अकोेलेकरांना उपलब्ध होणार असून, एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दोन ‘हॉट एअर बलून’चे शनिवार, १ डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन होणार आहे. यासाठीची जय्यत तयारी कृषी विद्यापीठाने केली आहे.देशांतर्गत युवा वर्गाला भारतीय लष्कराच्या जवानांचे साहसी कौशल्य करण्यासाठी भारतीय सेनेच्या साहसी बटालियनद्वारे उत्तर-दक्षिण भारत दौरा निश्चित केला असून, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या साहसी अभियानाची सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जवळपास ३,२३६ किमी अंतराचा साहसी प्रवास दोन हॉट एअर बलूनद्वारे पूर्ण करून भारतीय एकात्मतेचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे. जम्मू येथील झोरावर स्टेडियम येथून दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरू झालेली ही मोहीम देशभरातील जवळपास ३१ स्थानकांवर थांबा घेत आपल्या हवेतील साहसाने लक्षवेधी ठरत आहे. या मोहिमेचे शनिवार, १ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन होणार आहे.२ डिसेंबर रोजी सकाळ अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने कुतूहलाची ठरणार असून, भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनद्वारे अकोला येथून नांदेडकडे प्रयाण होईल. कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणातून हॉट एअर बलून सोबतच इतर बलूनद्वारे साहसी जवान हवाई मार्गाने रवाना होणार आहेत. लेफ्ट. कर्नल विवेक तेहलावत, भोपाळ यांच्यासह सुभेदार राजेश कुमार, जबलपूर यांच्या नेतृत्वात बलून पुढील सफरीसाठी निघणार आहेत.याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, ११ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल सी. एलवर्सन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. वेळेवर सुरू होणाºया या नयनरम्य सोहळ्याला शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे एनसीसी कॅडेट्स, कृषी विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. अकोला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या या उपक्रमाला उपस्थित राहून भारतीय सैन्यदलाबद्दल अधिक जाणून घ्यावे, क्रीडांगणावर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सहयोग करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ