अकोला, दि. २४- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोला जिल्हय़ात यावर्षी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये कामे करण्यासाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी २३ मार्चपर्यंंंत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या ६0६ कामांवर केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित असून, कामे प्रलंबित आहेत. याबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी शुक्रवारी विधिमंडळात लक्षवेधी दाखल केली असल्याने, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील कामांच्या अखर्चित निधीचा प्रश्न विधिमंडळात पोहोचला आहे. राज्यात वारंवार निर्माण होणार्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत गत तीन वर्षांंपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत करण्यात येणार्या कामांमुळे पाणीसाठय़ात वाढ होत असून, उपलब्ध पाणीसाठय़ाचा शेती सिंचनासाठी उपयोग होत आहे. या अभियानांतर्गत सन २0१६-१७ या वर्षात अकोला जिल्हय़ात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची ३ हजार ९६३ कामे करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ह्यजलयुक्त शिवारह्णच्या कामांसाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असला, तरी २३ मार्चपर्यंंंत जिल्हय़ात केवळ ६0६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उपलब्ध निधीपैकी केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर आराखड्यातील ३ हजार ३५७ कामे अद्याप प्रलंबित असून, या कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांचा अखर्चित निधी ह्यमार्च एन्डह्णनंतर शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त २४ मार्च रोजी ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हय़ातील जलयुक्त शिवारच्या कामांचा अखर्चित निधी आणि प्रलंबित असलेल्या कामांबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी लक्षवेधी दाखल करून, या प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली आहे.
‘जलयुक्त’च्या अखर्चित निधीचा प्रश्न विधिमंडळात!
By admin | Published: March 25, 2017 1:19 AM