-ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : राज्यात २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील एक हजार ७३ गावांमध्ये जलयुक्तची कामे करण्यात आली आहेत. त्यासाठी २९४.७ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यात आला आहे. जलयुक्तच्या या कामामुळे ९२ हजार ९४७ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. अनेक ठिकाणी यावर्षी पाणी साठवण्यास मोठी मदत झाली असून जलयुक्तने शिवारही ‘जलमय’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब वाचला!बिबी शिवारामध्ये जलयुक्तची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. बिबीमध्ये १३ सिमेट नाला बंधारा आहेत. यामुळे ७० ते ८० टीसीएम पाणीसाठा येथे झाला आहे. यावर्षी पाहिला पाणी आला ते पूर्ण येथे पाणी अडवल्याने ते जमीनीत जिरले. त्यामुळे आता पाणीसाठा येथे दिसून येतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा यशस्वी प्रयोग येथे बघावयास मिळतो. पाण्याचा एक थेंबही येथे वाया गेला नसून, सर्व पाणी अडवल्या गेले आहे.
लोणार तालुक्यातील बिबी, देवानगर या भागात जलयुक्तच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी वाढली आहे. विहिरीही तुडूंब भरल्या आहेत. बिबीमध्ये ८० टीसीएमपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे २०० ते २५० हेक्टर पाणी हे संरक्षीत म्हणून वापरता येणार आहे. मध्यंतरी पाऊस लांबल्याने कपाशीसारखे पिके संकटात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधाºयावर मोटारी टाकून २० ते २५ हेक्टरवरील कपाशी जगवली आहे. देवागनरमध्ये हा मोठा फायदा जलयुक्तच्या कामामुळे झाला आहे.- राजू शिरसाट, कृषी सहाय्यक लोणार.