अकोला : दिल्ली येथील जामिया-मिलीया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थी व विद्यार्थींनींना विद्यापीठातून बाहेर काढून मारहाण केल्याच्या घटनेचा अकोला येथील सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने मंगळवारी सरकारविरोधी निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील टॉवर चौकात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह व दिल्ली पोलिस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पश्चिम विदर्भ समन्वयक नितेश किर्तक,राजकुमार दामोदर, विकेश जगताप, योगेश किर्तक, धिरज पांडे, रितेश किर्तक, पंकज दामोदर, शुभम वानखडे, भुषण धनबहादुर, अमोल सदांशीव,,स्वप्नील वाघ, गणेश बोंडे, प्रेमकुमार वानखडे,अनिकेत कांबळे, मोबिन शेख, शुक्लोधन वानखडे ,शेषनिल वानखडे, रितेश वानखेडे ,योगेश वाहूरवाघ ,अजिंक्य तुरेराव, सतिश कारिया, सुमेद उपराट, दुर्गेश जगताप, मिलिंद इंगळे, सत्यसागर चौरपगार, शिरीष वानखडे, मंगेश किर्तक, आकाश इंगळे, मिलिंद वानखडे, शुक्लोधन डोंगरे, संदीप शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.