लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : नजीकच्या रामटेक (माना) तालुका मूर्तिजापूर येथील रहिवासी जयराज जीवधन बमानिया यांनी माहिती अधिकारांतर्गत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे त्यांनी केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली, त्याबाबतची माहिती मागितली होती.अपिलार्थी जयराज जीवधन बमानिया यांनी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून शीट नं. २६ डी प्लॉट नं. २0/२ व २0/३ च्या तक्रारीच्या अनुषंगाने विहित मुदतीत मागितलेली माहिती मिळाली नाही. त्यामुळे अपिलार्थीने कलम १९ (१) नुसार जोडपत्र ‘ब’प्रमाणे १३ डिसेंबर २0१३ रोजी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते; पण त्यांना मागितलेली माहिती मिळालीच नाही. त्यानंतर अपिलार्थीने द्वितीय अपील दाखल केले. मागितलेली माहिती तीन वर्षांपर्यंत न मिळाल्याने पुन्हा राज्य माहिती आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले. यावेळी आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी या प्रकरणाचा निकाल देऊन सन २0१३ च्या पूर्वीपासून माहितीचा तगादा लावूनदेखील अपिलार्थी यांना विहित मुदतीत माहिती दिली नाही. त्यासाठी जनमाहिती अधिकारी जबाबदार ठरत आहेत. म्हणून अपिलार्थीस आदेश प्राप्त झाल्यापासून नुकसानभरपाईपोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. अपिलार्थी जयराज बमानिया यांना नुकसानभरपाईपोटी तीन हजार रुपये मिळाले असल्याचे त्यांनी लिहून दिले आहे. मूर्तिजापूर तालुक्यात भूमिअभिलेख कार्यालयास दंड झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
जनमाहिती अधिकार्यास ठोठावला तीन हजाराचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:53 AM
मूर्तिजापूर : नजीकच्या रामटेक (माना) तालुका मूर्तिजापूर येथील रहिवासी जयराज जीवधन बमानिया यांनी माहिती अधिकारांतर्गत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे त्यांनी केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली, त्याबाबतची माहिती मागितली होती.
ठळक मुद्देराज्य माहिती आयुक्तांचा आदेशअपिलार्थीस आदेश प्राप्त झाल्यापासून नुकसानभरपाईपोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश