अकोला: अकोला पोलीस प्रशासनाच्यावतीने महिला व विध्यार्थिनींच्या सुरक्षा या विषयावर जनजगृती व्हावी या करिता जिल्हाभर जननी २ हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्या उपक्रमांतर्गत समाजातील काही नेतृत्व गुण असलेल्या महिलांना तीन दिवसीय कायदेविषयक प्रशिक्षण देऊन त्यांचे महिला सुरक्षा रक्षक पथक तयार करण्यात आले आहे.जननी २ हा उपक्रम तळागाळातील प्रत्येकापर्यंत जावा असा मानस पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या बैठकीत व्यक्त केला असून, यामधील उपाययोजना आणखी वाढविण्यासाठी रविवारी पोलीस मुख्यालय मनोरंजन हॉल येथे आढावा बैठकीचे घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. जनजागृती अधिक जास्त प्रमाणात करून प्रत्येकाने महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विक्रांत देशमुख यांनी केले. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करीत सर्व मिळून महिला सुरक्षेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी कामगिरीचा आढावा घेऊन कामकाजावर समाधान व्यक्त केले. तसेच यापुढील उपाययोजनेसाठी मार्गदर्शन केले. स्वास पथकाला अनुभव सांगत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढला. अकोला पोलीस दलाच्या या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आढावा बैठकीला डॉ. मानसा कालासागर, परिविक्षाधीन पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, वाहतूक शाखा प्रमुख तथा सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके, छाया वाघ तसेच गोपाल मुकुंदे, विशाल मोरे तसेच स्वास टीमचे सदस्य उपस्थित होते.