अकोला, दि. ८: उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेरधामना प्रकल्प येथून ६ मार्च रोजी चोरी गेलेले जेसीबी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही जेसीबी फिर्यादीच्या गावातूनच जप्त करण्यात आले आहे. धामना पोस्ट खांबोरा येथील रहिवासी रामेश्वर बळीराम भांबेरे यांची ९ लाख रुपये किमतीची जेसीबी चोरीस गेले होते. त्यानंतर उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला; मात्र पोलिसांना चोरट्यांचा शोध लागला नाही. उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार काटकर यांनीचौकशी करून तपास पूर्ण करीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासमोर हे प्रकरण आणले. पोलीस अधीक्षकांच्या प्रकरणातील गांभीर्य लक्षात येताच त्यांनी जेसीबी मालकासह त्यांचा लहान भाऊ व चालकास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये सदर जेसीबी धामना पोस्ट खांबोरा येथीलच रहिवासी संजय श्रीराम भांबेरे याच्याकडून जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश झोडगे, हरणे, चरहाटे यांच्यासह कर्मचार्यांनी केली.
पाच महिन्यांपूर्वी चोरीस गेलेले जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2016 2:36 AM