येथील आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड होत आहे. रखरखत्या उन्हात नागरिकांना तासनतास उभे राहावे लागते. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची सोय व्हावी, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रेस क्लबमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मंडप व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, यंत्रणेवरील ताण कमी होऊन लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचा उन्हापासून बचाव होईल, असे उद्गार काढले. ठाणेदार धीरज चव्हाण यांनीसुद्धा प्रेस क्लबचे कौतुक केले. यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे, ग्रा.पं. उपसरपंच रमेश दुतोंडे, डॉ. प्रियंका हिवराळे, रवींद्र मानकर, मार्गदर्शक गणेश अग्रवाल, किरण सेदानी, गोवर्धन गावंडे, मनीष भुडके, बलराज गावंडे, केशव कोरडे, गजानन दाभाडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष रितेश टिलावत, कार्याध्यक्ष प्रा. संतोषकुमार राऊत, सचिव जितेंद्र लाखोटिया, सहसचिव बाळासाहेब नेरकर, राजेश अस्वार, संजय मानके, सुनील बजाज, मोहन सोनोने, ज्ञानेश्वर गावंडे, प्रशांत भोपळे, संजय मानके, फारुख सौदागर, वसू मंडप डेकोरेशनचे संचालक उद्धव वसू, शिवा गावंडे, रमेश मानकर आदी उपस्थित होते.
जोपर्यंत लसीकरण सुरू राहील, तोपर्यंत प्रेस क्लबमार्फत मंडप व थंड पाण्याची सेवा सुरू राहील, अशी प्रतिक्रिया प्रेस क्लबचे किरण सेदानी व अध्यक्ष रितेश टिलावत यांनी दिली.