- सत्यशील सावरकर
तेल्हारा : शेतामध्ये वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी मेटाकुटीला आला. रात्री चे जागर करून पिक वाचविण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहेत. अशाच एका जुगाड टेक्नॉलॉजी चा वापर शेतकरी वन्यप्राणी संरक्षणासाठी करित आहेत. तेल्हारा तालुक्यातील बहुतांश भाग बागायती क्षेत्रात मोडत असल्याने पूर्व मान्सून कपासी मोठ्या प्रमाणात पेरा होतो. यावर्षी प्रखर उन्ह, पाण्याने गाठलेला तळ, बोंड अळीची धास्ती यामुळे कपासी पेरा कमी असला तरी कळासपट्टी भागात खंडाळा, सदरपूर, चितलवाडी, अडगाव, हिवरखेड, बेलखेड, वारखेड, सौदळा, हिंगणी, दानापूर भागात मान्सूनपूर्व कपासी पेरा होतो. मे महिन्यात लावलेली कपाशी चे वन्य प्राण्यांच्या पासून रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्र पाळीत जागर करित आहेत तर दिवसा सुद्धा हरणाचे कळपा पासून पिक वाचविण्यासाठी विविध शक्कल लढवून पिकांचे रक्षण करताना दिसतात. काही शेतकरी डफडे, ताशे वाजवून, बुजगावणे लावून रक्षण करतात. तालुक्यातील हिंगणी, एदलापूर, येथील शेतकरी दिपक तायडे, कोरडे यांनी आपल्या कल्पनेतून हिवरखेड येथील वेल्डिंग मशीन वर नेहमी वापरातील साहित्य वापरून वाजणारे कोपर तयार करून पिक रक्षणाची जुगाड टेक्नॉलॉजी केली. कमी खर्चात तयार केलेल्या या जुगाड टेक्नॉलॉजीने हरिण कळप, डुकरांचा त्रास कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. लागणारे साहित्य - कुलर चा पंखा, हलका कोपर सायकलचा चाकाचा बुदला, अॅक्सल याचा वापर करून वेल्डिंग मशीन वर तयार केले जाते. दरवर्षी मान्सूनपूर्व कपासीसाठी सुरूवातीला वन्यप्राणी त्रास देतात. पिक रक्षण करताना जीवमेटाकुटीस येतो त्या त्रासातून सुटण्यासाठी केलेली जुगाड म्हणजे आमचे वाजन यंत्र. ...दिपक तायडे एदलापूरकल्पक शेतकरी