शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

कनिष्ठ लिपिकाने स्वीकारली लाच

By admin | Published: May 23, 2014 10:45 PM

अकोला जिल्हा क्रीडा कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला २५00 रुपयांची लाच स्वीकारताना अटक

अकोला : २0 हजार रुपयांच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी तक्रारकर्त्याकडून २५00 रुपयांची लाच स्वीकारताना, जिल्हा क्रीडा कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अटक केली. कौलखेडे नामक तक्रारकर्त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची खापरवाडी बु. येथे मानवता धर्म शिक्षण व क्रीडा बहूद्देशीय संस्था आहे. या संस्थेने युवक कल्याणविषयक योजना २0१३-१४ नुसार गृह उद्योग कार्यक्रमांतर्गत अनुदानासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. अर्जानुसार संस्थेला २0 हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले. अनुदानाचा धनादेशसुद्धा जिल्हा क्रीडा कार्यालयात जमा झाला. अनुदानाचा धनादेश देण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विलास पुंडलिकराव देशमुख (४५ रा. संताजीनगर, सुधीर कॉलनी) याने ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने देशमुख याला मंगळवारी ५ हजार रुपयांपैकी २ हजार रुपयांची लाच दिली. त्यानंतर विलास देशमुख याने २३ मे रोजी त्यांना उर्वरित लाचेची रक्कम घेऊन क्रीडा कार्यालयात बोलाविले. त्यापूर्वी तक्रारकर्त्याने विलास देशमुख याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयात सापळा लावला. दरम्यान, तक्रारकर्त्याकडून कनिष्ठ लिपिक विलास देशमुख याने २५00 रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी देशमुख याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी केली.