मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या आसरा (शेलू बाजार)पर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याचे वृत्त प्रकाशित होताच, केवळ मुरूम टाकून सदरचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे टाकलेला मुरूम पावसामुळे वाहून जात आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत व वाहतूकदेखील मोठ्या प्रमाणात आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
रस्त्यावरील डागडुजी करण्यापेक्षा नवीन रस्त्याची निर्मिती करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष संजय गुप्ता यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या जिवाशी न खेळता, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हिरपूर-हिवरा कोरडेपर्यंतच्या मार्गावर डांबरीकरण करावे. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय गुप्ता यांनी दिला आहे.
फोटाे: