अकोला : दक्षिण भारताला उत्तर-पश्चिम भारताशी जोडणाऱ्या काचीगुडा-लालगढ-काचीगुडा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेची शेवटची फेरी २८ व ३१ ऑक्टोबरपर्यंत होती.
अकोला स्थानकावर थांबा असलेली ही विशेष रेल्वे २५ नोव्हेंबरपर्यंत धावणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०७०५३ काचीगुडा-लालगढ विशेष रेल्वे २५ नोव्हेंबरपर्यंत काचीगुडा येथून प्रत्येक शनिवारी रात्री २१:३० वाजता सुटेल आणि लालगढ जंक्शनला सोमवारी दुपारी १३:३५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०७०५४ लालगढ-काचीगुडा विशेष रेल्वे लालगढ येथून प्रत्येक मंगळवारी रात्री १९:४५ वाजता सुटेल आणि काचीगुडाला गुरुवारी सकाळी ०९:४० वाजता पोहोचेल. पूर्वाश्रमीची काचीगुडा-बिकानेर गाडीचा विस्तार गेल्या महिन्यात बिकानेरपासून पुढे असलेल्या लालगढ स्थानकापर्यंत करण्यात आला आहे.