तेल्हारा (अकोला) : पाथर्डी येथील शेतकरी रमेश कुकडे यांच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात तेल्हारा पोलिसांना यश आले असून आरोपीने ९0 हजारासाठी हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या विनायक वासुदेव कुकडे याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याने तपासाची दिशा निश्चित झाली आहे. यासंदर्भात अशी माहिती मिळाली की, पाथर्डी येथील सधन कास्तकार रमेश कुकडे व्याजाने पैसे देण्याचे काम करायचे. या हत्याकांडातील आरोपी विनायक हा रमेश कुकडे यांची शेती ठोक्याने करायचा. यामुळे दोघांत चांगले संबध होते. दोघात विश्वास संपादन झाल्यामुळे विनायक कुकडे वय ४६ याने रमेश कुकडे यांच्याकडून ९0 हजार रू पये हातउसणे घेतले होते. यानंतर दोघात वाद निर्माण झाले. रमेश कुकडे यांनी पैशाचा तगादा लावल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असे आरोपीने सांगितले. तेल्हारा पोलिसांनी विनायक कुकडे याच्याविरुद्ध कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला असून एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नंदकिशोर नागलकर, पीएसआय भस्मे, भास्कर, हेकाँ. खिल्लारे प्रकरणाचा तपास करीत आहेत.
९0 हजारांसाठी केली रमेश कुकडेंची हत्या
By admin | Published: June 20, 2016 1:54 AM