शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कलेमुळे कसे जगायचे ते कळते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:52 AM

प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, अनेक स्थित्यंतरे झालीत; मात्र कलेवर प्रेम करणारे व त्यासाठी जिवापाड मेहनत करणारे आजही आहेत. याचे प्रत्यंतर अकोल्यात विश्‍वास करंडकाच्या निमित्ताने आले आहे.

ठळक मुद्देविजय दळवी यांचे प्रतिपादन विश्‍वास करंडक बालनाट्य स्पध्रेला थाटात प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, अनेक स्थित्यंतरे झालीत; मात्र कलेवर प्रेम करणारे व त्यासाठी जिवापाड मेहनत करणारे आजही आहेत. याचे प्रत्यंतर अकोल्यात विश्‍वास करंडकाच्या निमित्ताने आले आहे. बालनाट्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा विश्‍वास करंडक बाल कलाकारांमध्ये विश्‍वास निर्माण करण्यचे काम करून निश्‍चितच पुरुषोत्तम करंडकसारखा नावलौकिक मिळवेल, असा आशावाद आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी तथा प्रख्यात साहित्यिक विजय दळवी यांनी व्यक्त केला. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉलमध्ये विश्‍वास करंडकाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधु जाधव, ‘ज्ञान हब’च्या संचालिका स्वर्णलता राठी, जेआरडी टाटा स्कूलचे संचालक प्रशांत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. दळवी यांनी विश्‍वास करंडक स्पर्धा ही बालनाट्य चळवळीला गतिमान करण्याचे काम करेल, असे स्पष्ट करून अकोल्याच्या नाट्य क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेतला.  प्रा. मधु जाधव यांनी विश्‍वास करंडकाच्या निमित्ताने बालनाट्य लेखकांनाही नवी प्रेरणा मिळाली असून, ही स्पर्धा  बालकलाकारांमधील प्रतिभेचा शोध घेणारा उपक्रम ठरेल, अशा आशा पल्लवित झाल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविकात प्रशांत गावंडे यांनी विश्‍वास करंडकामागील भूमिका स्पष्ट करून स्पध्रेच्या नियमावलीवर प्रकाश टाकला. या स्पध्रेत ३७ बालनाट्य सहभागी झाले आहेत. ही चांगली सुरुवात असल्याचे स्पष्ट केले. यावेळी जेआरडी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नांदी सादर करून या स्पध्रेचा शुभांरभ केला. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रशांत गावंडे, प्रा. मधू जाधव, डॉ. सुनील गजरे, प्रदीप खाडे, अविनाश पाटील, हिरल गावंडे, प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, विद्या गाडगे, अरुण गावंडे, रितेश महल्ले, नीलेश गाडगे, दिनेश अवारे, माधव जोशी, अविनाश कुळकर्णी, अमोल सावंत, लिलाधर तायडे, सुमित पांडे यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचे संचालन, आभारप्रदर्शन आदिती बनसोड व प्रतिषा गावंडे यांनी केले.

बालकलावंतांनी रसिकांना जिंकले! पातूर तालुक्यातील शिर्ला येथील एजुविला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘छान छोटे, वाईट मोठे’ हे नाटक प्रथम सादर करून स्पर्धेचा शुभारंभ केला. दिवसभरचाललेल्या या स्पर्धेत लढाईला गेला राजा, पर्यावरणाचा वाजला बाजा, पर्याय म्हणून फाशीच का?, दारूने मेला वं माय, नया आगाज, रणरागिणीचे बलिदान, ओम मित्रायं नम:, सार्वजनिक उत्सवांचा बिगुल, स्वप्न कश्मकश, श्यामची आई ही नाटके सादर करण्यात आली. ७, ८, ९ व ११ सप्टेंबर असे चार दिवस सदर स्पर्धा चालणार आहे. रोज सकाळी १0 वाजतापासून स्पर्धेतील नाटके सादर करण्यात येतील. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून अशोक ढेरे, गिरीष पडके व सतीन माजिरे हे नाट्य क्षेत्रातील दिग्गज काम करीत आहेत. 

८ सप्टेंबर रोजी होणारी नाटकेमी तुमची मुलगी बोलते, मला पण बोलू द्या, घुसमट, नो दि वर्ल्ड, एकच प्रेरणा महत्वाची, बेटी बचाव, प्रकाशवाट, ताई सोहनचे स्वप्न