लोकमत न्यूज नेटवर्कअकोले (जि. अहमदनगर) : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई गडाची चढाई अवघ्या ४२ मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी या गावातील १९ वर्षीय तरुण साजन तान्हाजी भांगरे याने आपल्या नावावर नोंदविला आहे.
महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाईचे शिखर समुद्रसपाटीपासून १,६४६ मीटर उंच आहे. या शिखराची चढाई गिर्यारोहकांची दमछाक करणारी आहे. साधारणतः हे शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहक व सामान्य माणूस यांना कमीत कमी दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो; परंतु, हा उभ्या चढणीचा गड साजन भांगरे याने अवघ्या ४२ मिनिटांत सर केला.
स्वत:चाच मोडला विक्रम n साजन हा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. याअगोदरही त्याने ४६ मिनिटांत कळसूबाई सर करण्याचा पराक्रम केला होता. n बारी (जहागीरदारवाडी) येथील गोपाळ कुंडलिक करटुले व सोमनाथ एकनाथ घोडे यांनी कळसूबाई शिखर ४७ मिनिटांत सर करीत अवघ्या २७ मिनिटांत पुन्हा पायथ्याशी येण्याचा विक्रम केला आहे.