अकोला : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बमसं यांच्या संयुक्त विद्यमाने ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता शहरातून भव्य कॅन्डल मार्च काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार, कोषाध्यक्ष राजाभाऊ लबडे, महानगर अध्यक्ष भीमराव तायडे, भारिप-बमसंचे कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, महासचिव अश्वजित शिरसाट उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभा कार्यालयापासून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. दारोकार गुरुजी, भारिप-बमसं मनपा गटनेते गजानन गवई यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलित करून मार्चला सुरुवात झाली. सर्व बौद्ध उपासक व उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून मार्चमध्ये सहभागी झाल्या. टॉवर चौक, धिंग्रा चौक मार्गक्रमणा करीत हा मार्च अशोक वाटिका येथे दाखल झाला. मेजर विजय हिवराळे व सुनील गजभार यांनी बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. सामूहिक बौद्धवंदना घेऊन समारोप करण्यात आला. याप्रसंगी अशोक सिरसाट, पंचशील गजघाटे, भीमराव खंडारे, राहुल अहिरे, स. रा. सरदार, राहुल गोटे, रतन जोगदंड, संजय गवई, डी. बी. शेगावकर, बुद्धरत्न इंगोले, बी. डी. वानखडे, संजय डोंगरे, सम्राट सुरवाडे, मंगला घाटोळे यांच्यासह शेकडो बौद्ध उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.
शेकडो बौद्ध बांधवांनी काढला कॅन्डल मार्च
By admin | Published: December 07, 2015 2:14 AM