पूर्व व दक्षिण झाेनमध्ये सर्वाधिक बाधित
काेराेनाची लागण झालेल्या ४०८ रुग्णांमध्ये सर्वाधिक बाधित व्यक्ती पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून आल्या आहेत. यामध्ये पूर्व झोन- १४५, पश्चिम झोन- ४३, उत्तर झोन- ३२ आणि दक्षिण झोनमध्ये सर्वाधिक १८८ रुग्ण काेराेनाबाधित निघाले.
पूर्व, दक्षिण झाेन हाॅटस्पाॅट
फेब्रुवारी महिन्यापासून शहरात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे समाेर आले आहे. यातही प्रामुख्याने पूर्व व दक्षिण झाेनचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून या दाेन्ही झाेनमधून सातत्याने रुग्णसंख्या वाढत चालली असून वैद्यकीय आराेग्य यंत्रणेच्या निष्कर्षानुसार दाेन्ही झाेन हाॅटस्पाॅट ठरले आहेत.
१२७७ जणांचे घेतले नमुने
मनपाच्या विविध चाचणी केंद्रांवर गुरुवारी १२७७ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये आरटीपीसीआरद्वारे ७२५ जणांनी चाचणी केली. तसेच ५५२ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. चाचणीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचे दिसत आहे.