अकोला : शेतकरी जागर मंचाच्यावतीने २३ आॅक्टोबर रोजी अकोेल्यातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता कासोधा परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, मागच्या वर्षी घेण्यात आलेल्या परिषदेतील मागण्यांचे लेखी आश्वासन देऊनही पूर्तता करण्यात आली नसल्याने मुख्यमंत्र्यांना या परिषदेतून याचा जाब विचारण्यात येणार आहे. परिषदेला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार कुमार केतकर, खासदार संजय सिंग, आमदार बच्चू कडू, रविकांत तुपकर, आमदार आशिष देशमुख, शंकरअण्णा धोंडगे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती शनिवारी शेतकरी जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.कासोधा परिषदेच्या अनुषंगाने सर्किट हाउस येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला मंचाचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे, जगदीश मुरू मकार, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर सुलताने, विजय देशमुख, ज्ञानेश्वर गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.होऊ घातलेल्या परिषदेत सर्व शेतमालाकरिता भावांतर योजना लागू करण्यात यावी, दुष्काळी अनुदान प्रतिहेक्टरी ६,८०० रुपये देण्यात यावे, सोने तारण कर्जमाफीच्या जाचक अटी दूर कराव्या, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीकरिता एकराचे निकष रद्द करण्यात यावे इत्यादीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर परिषदेत मंथन होणार असून, या मागण्या शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे मंचाच्या पदाधिकाºयांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दिलीप मोहोड, शे. अन्सार, सै. वासीफ, राजेश मंगळे, रवी अरबट, प्रदीप खोट्टे, दीपक गावंडे, प्रशांत नागे, मो. रेहान, विनोद राऊत, गजानन वारकरी, गजानन हरणे, तुषार पाचकोर, सै. सलीम, दिनकर वाघ, शे. साबीर, दिलीप मोहोड, नीलेश ठोकळ, अविनाश नाकट, संदीप महल्ले, कपिल ढोके, डॉ. विजय जाधव, प्रदीप चोरे, दिवाकर देशमुख, शिवाजीराव म्हैसने, ज्ञानेश्वर माळी, मंगेश मांगटे, दिवाकर गावंडे, रवी राठी, राम कोरडे, सम्राट डोंगरदिवे, प्रा. संतोष हुशे, मंचाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.