अकोला: गत आठवडाभरात दमदार पाऊस बरसल्याने, अमरावती विभागातील धरणांच्या जलसाठय़ांत वाढ झाली आहे. त्यामध्ये रविवारी सायंकाळपर्यंत अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरण २४.९१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा २३.७३ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३६.९0 टक्के जलसाठा उपलब्ध झाला. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. तसेच यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्यानंतर दीड महिना पावसाने दांडी मारली. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असतानाच, गत मंगळवार व बुधवारी विभागातील पाचही जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. दमदार पाऊस बरसल्याने, धरणांमधील जलसाठय़ात वाढ झाली. त्यामध्ये रविवारी सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणात २४.९१ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २३.७३ टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात ३६.९0 टक्के जलसाठा उपलब्ध झाला. धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास धरणाच्या जलसाठय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
काटेपूर्णा २५ टक्के
By admin | Published: August 10, 2015 1:39 AM