तालुकावगळता इतरत्र जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे काटेपूर्णा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे नदी तुडुंब भरून वाहत आहे. सदर पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात शिरल्याने पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु तालुक्यातील नद्या मात्र दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातून वाहत जात असलेल्या काटेपूर्णा व पूर्णा या दोन मोठ्या नद्या आहेत. दोन्ही नद्या दुथडी वाहत असून, काटेपूर्णा नदीला गुरुवारी सकाळी अचानक पूर आला. तालुक्यात भरपूर पाऊस झाल्याने नदी काठांवरील गावातील नागरिक गाफील राहिले; परंतु सकाळी एकाएकी पूर आल्याने समशेरपूर, गोरेगाव, गाजीपूर, सालतवडा, अटकळी, जांभा, दताळा, भटोरी, शेलू बोंडे, मंगरूळ कांबे आदी नदीकाठावरील गावातील शेतजमिनी पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फोटो :
मूर्तिजापूर-म्हैसांग-अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प.
मूर्तिजापूर-म्हैसांग-अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या नदीच्या विळख्यात येत असलेल्या काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळी ८ वाजता काटेपूर्णा नदीला अचानक पूर आल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. काही भागातील गावांचा संपर्क तुटला असून, पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
- प्रवीण खोत, सरपंच, समशेरपूर