लोकमत न्यूज नेटवर्कनिंबा फाटा : खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण्याचे आदेश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.यावेळी त्यांनी कवठा प्रकल्पातून १८00 हे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकर्यांची पाणी वापर संस्था तयार करून सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतीसाठी पाणी घेण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. विदर्भातील गोसेखुर्द प्रकल्पासह १00 प्रकल्प पूर्ण करण्याचा व विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर करण्याचा मानस असल्याचे संचालक सुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सदर प्रकल्प पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आ.बळीराम सिरस्कार यांनीही खारपाणपट्टय़ातील प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता संजय घाणेकर, अधीक्षक अभियंता देसाई, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, उपविभागीय अभियंता मनोज बोंडे, अभियंता दिलीप भालतिलक, प्रकल्प व्यवस्थापक संचालक रावसाहेब, प्रोजेक्ट मॅनेजर पठ्ठण शेट्टी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कवठा बॅरेज मार्चपर्यंत पूर्ण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:34 AM
खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण्याचे आदेश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.
ठळक मुद्देपाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांचे आदेश