आरोपी असलेल्या सचिवांना निष्पक्ष चौकशीच्या दृष्टीने पदावरून हटविण्यात आले नसल्याने राज्य प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आरोपीची पाठराखण करीत असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.
अकोट बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा उपनिबंधक पालेकर यांना दिलेल्या पत्रात सचिव राजकुमार माळवे व लेखापाल बोंद्रे यांच्यावर १६ लाख रुपयांची अफरातफर केल्याबाबतच्या लेखापरीक्षण अहवालानुसार पोलीस स्टेशन अकोट येथे फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लेखापाल बोंद्रे यांना तत्कालीन संचालक मंडळाने निलंबित केले. मात्र सचिव माळवे यांच्यावर समितीने अद्यापही कोणतीही कार्यवाही न करता सचिवाला अभय दिले आहे. सचिव माळवे यांना तात्काळ पुढील आदेशापर्यंत निलंबित करून नमूद तक्रारीमधील १८ गंभीर प्रशासकीय व आर्थिक प्रकरणाच्या विभागीय चौकशीचे आरोपपत्र प्रशासकांनी बजावावे, असे तक्रारीत
माजी सभापती गजानन पुंडकर यांनी
नमूद केले.
आरोपींना आश्रय देणाऱ्यावर कारवाईचे संकेत!
अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ लाख १९ हजार ७८५ रुपयांचा अपहार केल्याचे गुन्ह्यातील आरोपी सचिव राजकुमार माळवेसह दोघे बारा दिवसांपासून फरार आहेत. त्यामुळे शहर पोलीस आरोपींचा शोध घेत असले तरी आरोपींना कोणी आश्रय दिला काय, याची माहिती पोलीस घेत आहेत. गंभीर गुन्ह्यातील आरोपी आश्रय देत दडवून ठेवणे गुन्हा असल्याने त्यांच्यावरही पोलीस कारवाई होण्याची शक्यता पोलीस वर्तुळात असून सायबर क्राईम व इतर मार्गाने पोलीस आरोपींचा व त्यांना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेत असल्याचे समजते.