अकोला : शासनाची मान्यता नसताना, जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ वाणाच्या बियाण्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे काय, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवून, कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीच्या बैठकीत ते बोलत होते. एचबीटी वाणाच्या बियाणे विक्रीस शासनाची मान्यता नाही. त्यामुळे या वाणाच्या बियाण्याची विक्री आणि त्याद्वारे जिल्ह्यातील शेतकºयांची फसवणूक होणार नाही, यासंदर्भात गंभीरतेने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.शेतकºयांची फसवणूक होता कामा नये!खरीप पेरणीच्या कालावधीत जिल्ह्यात बोगस बियाण्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवून, बोगस बियाणे विक्रीतून शेतकºयांची फसवणूक होता कामा नये, असे सांगत बियाणे विक्रीतून शेतकºयांची फसवणूक होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाºयांना दिले.