खामगाव : प्रस्तावित नवीन २२ जिल्हे आणि ४९ निर्मितीबाबत राज्य सरकारने मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. त्यामध्ये वित्त, महसूल नियोजन विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यामध्ये खामगाव जिल्हा निर्मितीबाबतही विचार होणार आहे. बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करून घाटाखालील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव खामगाव या सहा तालुक्यांचा समावेश खामगाव जिल्ह्यात राहणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची जिल्हय़ाची मागणी पूर्ण होणार असल्याची आशा लागली आहे. आमदार पांडुरंग फुंडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खामगाव जिल्हा निर्मिर्तीबाबत त्यांनी आणि आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. नवीन २२ जिल्हे निमिर्तीचा प्रस्ताव असून, त्यात खामगावचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
*१९९८ नंतर प्रस्ताव
राज्यात १९८८ नंतर दहा जिल्ह्यांची निमिर्ती करण्यात आली आहे. सध्या ३६ जिल्हे व २८८ तालुके आहेत; मात्न सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयींची असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुका निर्मिर्तीची मागणी केली आहे.
*एका जिल्ह्यासाठी तब्बल ३५0 कोटींचा येतो खर्च
महसूल राज्यमंत्नी संजय राठोड यांच्या दालनात यासंदर्भात बुधवारी बैठकही पार पडली. एका जिल्ह्याच्या निर्मिर्तीसाठी किमान ३५0 कोटी रुपये खर्च येतो. राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे; मात्र मागणीमुळे २२ नवीन जिल्हे निर्मिर्तीच्या दिशेने शासनाने पाऊल टाकले आहे.