अकोला : शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक व समाजसेवी ज्ञानप्रकाशजी खंडेलवाल यांचे सुपुत्र डॉ. विनय खंडेलवाल यांनी आपल्या खंडेलवाल हेल्थ केअरची रुजवात काल सायंकाळी अकोल्यात केली.
अमरावती येथून एमबीबीएसची पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. विनय यांनी आपले एम. डी. (मेडिसिन) कऱ्हाड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले. तेथेच मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये जवळपास ३ वर्ष रुग्ण तपासणीचे काम केले. मुंबई येथील प्रख्यात जसलोक हॉस्पिटलमध्ये क्रिटीकल केअर आयसीयूमध्ये काम करण्याचा अनुभव घेतल्यानंतर पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमधून २ डी एकोची फेलोशीप प्राप्त केली. आरएलटी कॉलेजसमोरील यमुना संकुल या इमारतीमध्ये असलेल्या या डे केअर युनिटमध्ये हृदयरोग, मधुमेह, दमा, मेंदूविकार, थायराॅईड, पोटाचे विकार, पॅरेलिसीस, काविळ, कोविड, मेंदूज्वर, किडनी रोग, मलेरिया आदी रोगांवर व रुग्णांवर उपचार केले जातील. मागील वर्षी कोविड काळात नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात जवळपास १ वर्ष कोरोना रुग्ण विभागाचे प्रमुख कन्स्लटंट म्हणून काम पाहताना, शेकडो रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणले आणि कोविड रुग्ण तपासणीचा व उपचाराचा भरपूर अनुभव मिळवता आल्याचे डॉ. विनय यांनी यावेळी सांगितले. या नवीन हेल्थ केअर सेंटरमध्ये रुग्णाला उपचारासोबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, सर्व अत्याधुनिक साधने, २ डी एको, ईसीजी, नेब्युलायझर, ग्लुकोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, कार्डियाक मॉनिटर इत्यादी सुविधा डे केअरसहित उपलब्ध राहणार आहेत. खंडेलवाल परिवारातील ज्येष्ठ सदस्य मुरलीधरजी खंडेलवाल, चार्टर्ड अकाउंटन्ट बी. एम. खंडेलवाल, योगेश खंडेलवाल यांच्यासह खंडेलवाल परिवारातील सर्व सदस्य व आप्तस्वकीय याप्रसंगी उपस्थित होते. (वा.प्र.) ८ बाय १२
फोटो
‘५० वर्षांवरील होमगार्ड सैनिकांना बंदोबस्त मिळावा!’
अकोला : ५० वर्षांवरील वयोगटातील अकोला येथील महिला व पुरुष होमगार्डस् सैनिकांना जिल्ह्यात बंदोबस्त मिळावा, अशी मागणी करत होमगार्ड सैनिकांनी शासकीय विश्रामगृह अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कोरोनाच्या संकटात अनेकांचे रोजगार गेले असून, अनेक वर्षांपासून होमगार्ड सैनिक म्हणून जबाबदारीने कार्य करत असताना ऐन कोरोनाच्या काळात सेवा रद्द केल्याची निवेदनात नमूद आहे. हे निवेदन संजय अलोने, दीपक सूर्यवंशी, संजय धरमकर, मंगेश अनेरकर, अनिल गावंडे, भीमराव जंजाळ, निखाडे, श्रीकांत वानखडे, एल. पी. वानखडे, शिवलाल तायडे यांच्यासह पन्नास वर्षांवरील महिला व पुरुष होमगार्डस् सैनिकांनी दिले. (फोटो)