यामध्ये कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून जमिनीची मशागत करावी, कपाशी पिकाच्या बियाण्याची निवड करताना लवकर येणार वाणाची निवड करावी, कपाशीची लागवड ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी १ जूननंतर पेरणी करावी व कोरडवाहू जमिनीत लागवड करताना ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी आदींबाबत मार्गदर्शन कुलदीप देशमुख कृषी विद्यावेत्ता कृषी विज्ञान केंद्र अकोला यांनी केले.
तसेच कार्यक्रमासाठी मिलिंद वानखेडे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीन बियाणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनेविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी हिवरखेड गौरव राऊत व कृषी सहायक मनोज कुमार सारभूकन यांनी केले होते.