अकोला: विदर्भात सतत तुरळक पाऊस सुरू असल्याने शेते शेवाळली असूून, पिकांना प्रकाशसंश्लेषणही होत नसल्याने पिके पिवळी आहेत. परिणामी यावर्षीही उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात ५० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली असून, सर्वाधिक जास्त कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पावसाळ््याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर पुन्हा चार आठवडे पावसाचा खंड पडल्याने हजारो हेक्टरवरील पिके हातची गेली. शेतकऱ्यांना त्यावर नांगर फिरवावा लागला. २६ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तथापि, हा पाऊस दमदार नसला तरी सतत तुरळक स्वरू पाचा पडत असून, कायम ढगाळ वातावरण असल्याने पिकांना प्रकाशसंश्लेषण होत नसून, श्ोतात बुरशी निर्माण झाली. परिणामी पिके पिवळी पडली आहेत. सध्या सोयाबीन पीक फुलोºयावर येण्याच्या अवस्थेत आहे. तथापि, या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यावर परिणाम होताना दिसत आहे. कापूस पिकांची स्थिती हीच आहे. इतर पिके पिवळी पडली आहेत. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, सोयाबीनवर प्रचंड कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसोशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, आत्यांतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे; परंतु प्रतिकूल वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
सतत पाऊस सुरू असल्याने जमीन शेवाळली असून, पिकांच्या मुळांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिके पिवळी पडत आहेत. या सर्व परिस्थितीचा पिकांवर परिणाम होत असला तरी शेतकºयांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांचे व्यवस्थापन करावे. - डॉ.जे.पी. देशमुख,ज्येष्ठ शास्त्रज्ञ,कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.