शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

जिल्ह्यातील खरीप पेरणी आटोपण्याच्या मार्गावर!

By संतोष येलकर | Updated: July 13, 2024 18:16 IST

पावसानंतर गती : ३.७१ लाख हेक्टरवरील पेरणी आटोपली

संतोष येलकर, अकोला : गेल्या आठवड्यात दोन दिवस बरसलेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरणीला गती आल्याने, शुक्रवार १२ जुलैपर्यंत ३ लाख ७० हजार ८५३ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पेरणी आटोपली. उर्वरित ७२ हजार हेक्टरवरील पेरणी एक ते दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी जिल्ह्यात आटोपण्याच्या मार्गावर असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ४ लाख ४३ हजार हेक्टर इतके आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी अधून मधून बरसलेल्या पावसात गेल्या आठवड्यापर्यंत जवळपास ६० ते ६५ टक्के पेरणी आटोपली होती. पेरणीलायक सार्वत्रिक जोरदार पावसाअभावी जिल्ह्यातील उर्वरित पेरणी खोळंबली होती. गेल्या आठवड्यात ६ ते ८ जुलैदरम्यान तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी व नाल्यांना पूर आला. त्यानंतर रखडलेल्या पेरणीला गती आली असून, १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८३.७० टक्के खरीप पेरणी पूर्ण करण्यात आली.८३.७० टक्के अशी आटोपली पेरणीपीक क्षेत्र (हेक्टर)सोयाबीन २,०३,७६०कापूस १,१२,०४१तूर ५२,१३१उडीद १,३०५मूग १,२३९ज्वारी २८०मका ६४तीळ ३२७२ हजार हेक्टरवरील पेरणी दोन दिवसांत पूर्ण होणार ?

जिल्ह्यातील एकूण ४ लाख ४३ हजार खरीप पेरणी क्षेत्रापैकी १२ जुलैपर्यंत ३ लाख ७० हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी आटोपली असून, उर्वरित ७२ हजार १४७ हेक्टरवरील पेरणी १३ व १४ जुलै रोजी या दोन दिवसांच्या कालावधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.१९३ मेट्रिक टन संरक्षित खतसाठा होणार मुक्त !

जिल्ह्यातील खरीप पेरणी आटोपण्याच्या मार्गावर असतानाच उगवलेल्या पिकांसाठी रासायनिक खतांची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर १९३ मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा सोमवारपर्यंत विक्रीसाठी मुक्त करण्यात येणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार संबंधित संरक्षित खतसाठा मुक्त करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संरक्षित खतसाठा मुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी दिली.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी