सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी रात्री उशिरा मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून प्रसिद्ध व्यवसायी किशोर खत्री यांची ३ नोव्हेंबर २0१५ रोजी सोमठाणा शेत शिवारामध्ये बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल, राजू मेहेर व पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंतसिंह चौहान या चौघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. सोमठाण्यात घडलेल्या रक्तरंजित थराराची कबुली पोलीस कर्मचारी जस्सी याने पोलिसांसमोर त्यावेळी दिली होती. त्यानंतर यामधील चुंगडे, जस्सी हे कारागृहात आहेत. जिल्हा न्यायालय नागपूर खंडपीठाने चुंगडे यांचा जामीन अर्ज फेटाळला. जुने शहर पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्जवल निकम यांची नियुक्ती केल्याची माहिती आहे.
खत्री हत्याकांड; अँड. निकम बाजू मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 3:04 AM
अकोला: शहरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांड प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी रात्री उशिरा मिळणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
ठळक मुद्देसरकार पक्षातर्फे प्रसिद्ध सरकारी विधिज्ञ अँड. उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती अँड. निकम यांच्या नियुक्तीची अधिसूचना मंगळवारी रात्री उशिरा मिळणार