शेगाव (जि. बुलडाणा), दि. १: दोन महिन्यांपुर्वी अकोला जिल्ह्यातील आकोट येथून अपहरण झालेली साडेपाच वर्षांची मुलगी गुरुवारी शेगावात सापडली.आकोट येथील संतोष शामराव लकडे या मजुराची मुलगी मनुश्री ही खेळत असताना तिचे अपहरण झाल्याची तक्रारीवरुन आकोट पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती एका अनोळखी महिलेने मनुश्रीचे अपहरण केल्याचे उघडकीस आले होते. त्या दृष्टीने तपास सुरु असताना गुरुवारी अचानकपणे मंजुश्री ही मुलगी शेगाव येथे आढळून आली. सदर बालिकेस विचारपूस केली असता ती आकोटची असल्याचे समजले. मनुश्रीने दिलेल्या माहितीवरून शेगाव पोलिसांनी आकोट पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यामुळे दुपारी आकोट येथून पोलिसांचे पथक पोहचले. दरम्यान, शेगावचे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी अपहरणाबाबत बालिकेला विचारपूस केली असता एका महिलेने तिचे अपहरण केले असल्याची माहिती या बालिकेने दिली. त्यानंतर खामगाव येथील एएसपी यशवंत सोळंके यांनी सुद्धा शेगावला भेट घटनेची माहिती घेतली.नंतर त्या बालिकेला आकोट पोलीस व नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.मनुश्रीचे नाव ठेवले होते पूनमअपहरण केल्यानंतर मनुश्री लकडे. या बालिकेचे नाव अपहरणकतीं महिलेने पूनम असे ठेवले होते. ज्या घरात आपल्याला ठेवले होते.तेथे आपल्या समवेत आणखी ४ मुले आणि ५ मुली ठेवण्यात आल्याची माहिती मंजुश्रीने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांकडून सदर महिलेचा शोध घेण्यात येत आहे.
आकोटची अपहृत बालिका शेगावात मिळाली
By admin | Published: September 02, 2016 1:48 AM