लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु. (अकोला): पातूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या च तारी गावामध्ये दूषित पाण्यामुळे ३0 ते ३५ किडणीग्रस्तांना आपला प्राण गमवावा लागला. या संदर्भात चतारी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील विजय सरदार यांनी गांभीर्याने दखल घेऊन गेली सात वर्षापासून किडणीग्रस्तांची व्यथा शासनाकडे मांडली. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्यपाल व खासदार संजय धोत्रे यांचेकडे रितसर निवेदन देऊन चतारी येथे जलशुद्धीकरण यंत्र उभारणीची विनंती केली. एवढेच नव्हे तर लोकशाही सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय येथील लोकशाही दिनात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचेकडे १७ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार केली. सदरच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. चतारी येथे लवकरच जलशुद्धीकरण यंत्र उभारल्या जाईल, असे आश्वासित केले व तसे संबंधित यंत्रणेला आदेशित केले. जिल्हा निय९ाजन समितीने सन २0१७-१८ अंतर्गत जलशुद्धीकरण यंत्राकरिता रु. ८९.५१ लाखाची तरतूद केली असून जलशुद्धीकरण यंत्र (आर.ओ. युनिट) करी ता मंजू केलेल्या निधीमधून मौजे चतारी येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे प्रस् तावित आहे, असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. अकोला यांचे लेखी पत्रानुसार पोलीस पाटील यांना कळविले. अथक परिरमानं तर चतारी येथे जलशुद्धीकरण यंत्र लवकर उभारल्या जाणार आहे. याकामी जि.प. अध्यक्षा संध्या वाघोडे, प्रतिभा अवचार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, जि. प. सदस्या अनिता आखरे, ग्रा. पं. चतारीचे पदाधिकारी व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे पोलीस पाटील विजय सरदार यांनी सांगितले.
पालकमंत्री रणजिीा पाटील, खासदार संजय धोत्रे यांनी निवेदनाची दखल घेतल्याने व ग्रामस्थांचे सहकार्यामुळे किडनीग्रस्तांना न्याय मिळाल्याचे समाधान आहे.- विजय सरदार, पोलीस पाटील, चतारी