संतोष येलकर / अकोलाविधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्यामध्ये मंगळवारी जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी गृहपाठ दिला जाणार आहे. हा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी होणार्या मतदान प्रक्रियेत, आई-वडिलांनी मतदानाचा हक्क बजावला की नाही, याबाबत मुलं आपल्या आई-वडिलांच्या बोटावरील मतदानाची शाई पाहणार आहेत.विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात बुधवार, १५ ऑक्टोबर मतदान घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्येच जिल्हय़ातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी मतदानासंबंधी गृहपाठ (होमवर्क) दिला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हय़ातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी ह्यहोमवर्कह्ण दिले जाणार असून, या ह्यहोमवर्कह्णची तपासणी मतदानाच्या दुसर्या दिवशी गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी शिक्षकांकडून केली जाणार आहे. त्यानुषंगाने मतदानासंबंधीच्या ह्यहोमवर्कह्णमधील प्रश्नांची उत्तरे लिहून, होमवर्क पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मतदान प्रक्रियेत आपल्या आई-वडिलांसह घरातील किती जणांनी मतदान केले, यासंबंधीची माहिती घ्यावी लागणार आहे. एवढेच नाही तर आई-वडिलांनी मतदान केल्याबाबत त्यांच्या बोटावरील मतदानाची शाई बघून मुलं खात्री करून घेणार आहेत.४00 शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना जिल्हाधिकार्यांचे पत्र!विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याकरिता, मदानासंबंधी विद्यार्थ्यांना ह्यहोमवर्कह्ण देण्याबाबत जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्हय़ातील ४00 शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र दिले आहे. तसेच ९0 केंद्रप्रमुखांनाही यासंदर्भात पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत, असे मतदार जागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्रकाश अंधारे यांनी सांगितले.
मुलं पाहतील पालकांच्या बोटांवरची ‘शाई’!
By admin | Published: October 14, 2014 1:27 AM