गेल्या काही दिवसांपूर्वी वाॅर्ड क्रमांक ४ मधील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची भरउन्हात भटकंती होत आहे. वाॅर्ड क्रमांक ४ मधील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली; परंतु सरपंच हेतूपुरस्पर पाणीपुरवठा सुरळीत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळखुटा येथे जवळपास २० ते २२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे, तरी गावात स्वच्छता मोहीम राबवली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत सरपंच यांच्याशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. (फोटो)
ग्रामपंचायतची मासिक सभा कागदोपत्री
मार्च महिन्याची मासिक सभा घेण्यासाठी सदस्यांना नोटीस काढण्यात आली. मात्र, अद्यापही मासिक सभा घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.
मार्च महिन्याची मासिक सभा घेण्यासाठी सदस्यांना नोटीस देण्यात आली; परंतु मासिक सभा कागदोपत्री घेण्यात आली. गावात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असून, वाॅर्ड क्रमांक ४ मधील पाणीपुरवठा ठप्प असल्याने पाण्यासाठी महिला व ग्रामस्थांची भरउन्हात भटकंती होत आहे.
-आसेफा बी आरेफ पठाण, ग्रा.पं. सदस्य, पिंपळखुटा.