अकोला: केंद्रातील सरकाने केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात किसान ब्रिगेड संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. तसेच कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने, या कायद्यांना स्थगिती देण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला किसान ब्रिगेड संघटनेने पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी घेण्यात आलेल्या निषेध सभेत शेतकरीविरोधी कृषी कायद्यांचा विरोध करण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात किसान ब्रिगेड संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे, राष्ट्रीय समन्वयक अविनाश काकडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे यांच्यासह जीवन पाटील, राम मुळे, विठ्ठल गाढे,धनंजय घुमरे, बी. संतोषकुमार, प्रभाकर तेजनकर, नामदेव अढाऊ, सलीम सिद्दीकी, महादेवराव भुइभार, ज्ञानदेव मालोकार, दिनकर जायले, रवींद्र मालोकार, वसंता मालोकार, कृष्णराव देशमुख, विनायक पाटील, उमेश वानखडे, विजय मुरुमकार, राजू खान, सोहेल खान, बादशाह खान, महादेव वासनकर, परवेज खान, श्रीकृष्ण माळी आदी सहभागी झाले होते.
.............फोटो..............