बुलडाणा: राजूर घाटात सापडलेल्या दोन मृतदेह प्रकरणातील तपासाला हळूहळू दिशा मिळत असून, ते मृतदेह मनीषसिंग क्षेत्रीय व आदर्श गंगाराम यांचे नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, दोन्ही मृतदेहांपैकी एक मृतदेह राजस्थान येथील किसन चौधरी यांचा असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. हा मृत किसन चौधरी आसाराम बापूंचा साधक असल्याचे समजते. या मृतदेहप्रकरणी चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी दोघा संशयितांना मुंबई येथून ताब्यात घेतले होते; मात्र त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले आहे.आता या नव्या खुलाशामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचीच दिशा बदलत ठाणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी येथील राजूर घाटात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. शवविच्छेदन अहवालातही या दोघांच्या मृ त्यूचे कारण कळू न शकल्याने आणि घटनास्थळी आढळून आलेल्या उत्तर प्रदेशातील मतदान कार्ड आणि छत्तीसगड राज्यातील एटीएम कार्डमुळे पोलिसांसाठी हा तपास गुं तागुंतीचा ठरला आहे. तपास अधिकार्यांची दिशाभूल करण्यासाठी पद्धतशीरपणे खोटे पुरावे घटनास्थळी ठेवले गेले असावेत, असा कयास पोलीस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, एपीआय रविराज जाधव यांच्या नेतृत्वात एक पथक उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यात जाऊन आले. छत्तीसगड आणि उत्तरप्रदेशमध्ये गेलेल्या पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मृतदेहाजवळ सापडलेला मोबाइल मुंबई येथून विकत घेतल्याचे आणि बिलावर किसन चौधरी असे नाव असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे एक मृतदेह हा किसन चौधरीचा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. किसन चौधरीचा आसाराम बापंच्या आश्रमाशी संबंध आहे काय, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.
राजूर घाटातील मृतदेह किसन चौधरी याचा
By admin | Published: February 15, 2016 2:29 AM