अकोला: लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी ग्रामसेवक, विस्तार अधिकाºयांनी याद्याच न दिल्याने शेतकरी लाभापासून वंचित असल्याची माहिती पातूर तहसीलदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिली. या बाबीची गंभीर दखल घेतली गेल्याने ग्रामसेवकांनी तातडीने कामाला सुरुवात केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक शेतकºयांची तहसील कार्यालयात पायपीट सुरू आहे; मात्र अधिकारी, कर्मचारी कोणीही केव्हा निधी मिळेल, याबाबत उत्तर द्यायला तयार नसल्याने ही योजना फसवी ठरणार तर नाही ना, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.दरम्यान, पात्र शेतकºयांच्या याद्या तयार करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच विस्तार अधिकारी, गटविकास अधिकाºयांनी आढावा घेऊन माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार गावपातळीवर काम करणे अपेक्षित असताना पातूर तालुक्यातील ग्रामसेवकांनी या कामाला सुरुवातच केली नाही. ही बाब तहसीलदारांनी ३० जून रोजीच्या पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना कळवली. त्यामध्ये आलेगाव मंडळातील चरणगावाची जबाबदारी ग्रामसेवक बी.बी. आडे, जी.एस. वावगे यांच्याकडे होती. तर पर्यवेक्षक म्हणून विस्तार अधिकारी आर.एस. गवई यांची नियुक्ती आहे. यापैकी कुणीही कामाला सुरुवात केली नाही. सोबतच पर्यवेक्षक असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी दीपमाला भटकर, विस्तार अधिकारी डी.एम. ननीर, ए.पी. लव्हाळे यांनीही कामाला सुरुवात केली नसल्याचे तहसीलदारांनी जिल्हाधिकाºयांसह मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्रातून कळवले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तातडीने कामाला सुरुवात करण्याचे बजावले. रक्कम कधी मिळणारयोजनेच्या माध्यमातून शेतकºयांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली. प्रत्येक शेतकºयाच्या खात्यात तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये वळते करण्यात येणार होते. त्यापैकी काही शेतकºयांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला तर काही शेतकºयांना अद्याप काहीही मिळाले नाही. यावर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकºयांची पेरणीसाठी जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे.