अकोला : केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारत, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान विकास मंचच्यावतीने शनिवारी अकोल्यातील वाशिम बायपास चौक, मलकापूर, बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, शेतकरी विरोधी तीन कृषी कायद्यांविरोधात किसान विकास मंचच्यावतीने ६ फेब्रुवारी रोजी दुपारी अकोला शहरातील वाशिम बायपास चौक, मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्ग तसेच बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चारही ठिकाणी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत चक्काजाम केला. त्यामुळे चारही ठिकाणी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. या आंदोलनात किसान विकास मंचचे अविनाश देशमुख व विवेक पारसकर यांच्या नेतृत्वात प्रमोद देंडवे, प्रशांत गावंडे, गणेश कळसकर, सागर कावरे, नीलेश काळंके, धनंजय दांडळे, गजानन गवई, निखिलेश दिवेकर, आकाश कवडे, सचिन शिराळे, पुष्पा गुलवाड़े, मनीषा महल्ले, सुनीता धुरंदर, अनवर शेरा, मो. शारीक,राजकुमार शिरसाट, गजानन दांडगे, राहुल सारवान, राजीव इटोले, सुनील रत्नपारखी, अंकुश भेंडेकर, अभिजीत तवर, मनीष थोटांगे, उमेश टेकाडे, रेहान खान, महादेव इंगळे, युनूस शहा, अंकुश गावंडे, राहुल इंगळे, निळकंठ पाचपोहे, डिगांबर बोर्डे, आदित्य गावंडे, अंकुश राऊत, गोपाळ जायले, शुभम परनाटे, हरीश नवले, प्रसाद फाटकर, आशिष चोरे, संतोष गायकवाड, भय्यू भागडे आदी सहभागी झाले होते.
महामार्गावर वाहतूक विस्कळीत;
वाहनांच्या लागल्या होत्या रांगा
किसान विकास मंचच्यावतीने अकोला शहरातील वाशिम बायपास चौक, मलकापूर तसेच बोरगावमंजू व पातूर येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे अर्धा तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पोलिसांनी आंदोलकांना
ताब्यात घेऊन सोडले!
चक्काजाम आंदोलनात सहभागी आंदोलक किसान विकास मंचचे पदाधिकारी व शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन, संबंधित पोलीस स्टेशनमध्ये नेले. काही वेळानंतर आंदोलक शेतकऱ्यांना सोडण्यात आले.
...........................................फोटो....................................