अकोला: समाजसेवी किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या दहाही आरोपींना शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. हा वाद विकोपाला गेल्यामुळे ६ मे रोजी दुपारी किसनराव हुंडीवाले यांची न्यास नोंदणी कार्यालयात भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहीरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे व साबीर यांच्यासह इतर साथीदारांनी हत्या केली होती. या सर्व आरोपींना सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने आरोपीस १७ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. शुक्रवारी आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दहाही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून घेतला. पोलिसांनीही आरोपींना कारागृहात पाठविण्याची मागणी केली. त्यामुळे न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)