लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी नायब तहसीलदार आणि मोटार वाहन उपनिरीक्षक यांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे उपस्थित होते. शनिवारी जिल्हा न्यायालयात आणखी दोघांच्या साक्ष नोंदविण्यात येणार आहेत. अँड. निकम हे शुक्रवारी अकोल्यात आले आहेत. सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची आर्थिक वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांची हत्या केल्याचा रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, पोलीस कर्मचारी जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे यांच्यावर आरोप आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यांपूर्वी या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी दोन साक्षीदारांची साक्ष तपासली होती. यामध्ये दिल्ली येथील बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंग कुशवाह आणि सोमठाणाचे पोलीस पाटील किशोर दुतोंडे यांची साक्ष त्यांनी तपासली होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात प्रवीण नागट याची साक्ष नोंदविण्यात आली होती. खत्री हत्याकांडामध्ये सरकारची बाजू अँड. उज्ज्वल निकम मांडत असल्याने, या खटल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी नायब तहसीलदार आणि मोटार वाहन उपनिरीक्षकांची साक्ष न्यायालयाने नोंदविली. शनिवारी आणखी दोघांच्या साक्ष नोंदविण्यात येतील.
किशोर खत्री हत्याकांड; दोघांची साक्ष नोंदविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:46 AM
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांडामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी नायब तहसीलदार आणि मोटार वाहन उपनिरीक्षक यांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे उपस्थित होते. शनिवारी जिल्हा न्यायालयात आणखी दोघांच्या साक्ष नोंदविण्यात येणार आहेत. अँड. निकम हे शुक्रवारी अकोल्यात आले आहेत.
ठळक मुद्देअँड. निकम अकोल्यात : आज आणखी साक्ष