अकोला : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोल्हापूर ते नागपूर दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धाणारी विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १२ मार्चपासून सुुर होणार असलेल्या या गाड्यांना अकोला व मुर्तीजापूर येथे थांबा देण्यात आला आहे.
मध्ये रेल्वेच्या भूसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनूसार, ०१४्र०४ ही द्वि साप्ताहिक विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून १२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवार आणि शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.०० वाजता नागपूर येथे पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दर मंगळवार व शनिवारी येणार आहे.
०१४्र०३ ही द्वि साप्ताहिक विशेष गाडी नागपूर येथून १३ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार व शनिवारी दुपारी ०३.१५ वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ०२.०० वाजता पोहचणार आहे. ही गाडी दर मंगळवार व शनिवारी अकोला स्थानकावर येणार आहे.
या गाड्यांना मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी येथे थांबा असणार आहे.
एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, तीन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १० शयनयान, ५ द्वितीय श्रेणी आसन, अशी या गाड्यांची संरचना असून, केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. पूर्णपणे राखीव असलेल्या या विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने १ मार्च पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले राहणार आहे.