वाडेगाव: बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथे गत काही वर्षांपासून कोंडवाड्याची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कोंडवाडा बंद असल्याने मोकाट गुरे गावाशेजारी असलेल्या शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. तसेच गावात मोकाट गुरांचा ठिय्या रस्त्यावरच असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
वाडेगाव येथे मोकाट गुरांचा हैदोस वाढला असून, या मोकाट गुरांसाठी असलेल्या कोंडवाड्याची दयनीय अवस्था झाली आहेत. गावातील कोंडवाड्याच्या भींती पडल्या असून, येथे नागरिक कचरा टाकीत असल्याचे चित्र आहे. कोंडवाडा बंद असल्याने गावातील मोकाट गुरे हे गावाशेजारी असलेल्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान करीत आहेत. काही नागरिक मोकाट गुरांच्याआड गुरे शेतात चरण्यासाठी सोडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. बंद पडलेल्या कोंडवाड्याचे नुतनीकाण करण्याची मागणी जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, मोह्ममद आफ्तार यांच्यासह ग्रामस्थांनी केली होती, मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. (फोटो)
---------------------------------
मी काही दिवसांपूर्वीच ग्रा.पं.चा कारभार हाती घेतला आहे. मासीक सभेमध्ये कोंडवाड्याच्या नुतनीकरणाचा विषय घेऊन लवकरच १५ व्या वित्त आयोगातुन तरतुद करू.
- डिवरे,
ग्रामसेवक, ग्रा.पं.कार्यालय वाडेगाव.
----------------------------
कोंडवाडा बंद असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.
-शेख सलीम शेख रहुल्ला, वाडेगाव.
--------------------------------------