संतोष येलकर
अकोला : महसूल विभागांतर्गत गाव पातळीवर काम करणाऱ्या कोतवालांच्या कामाचा व्याप मोठा असला तरी कामाच्या मोबदल्यात दरमहा मिळणारे ७ हजार ५०० रुपये मानधन तुटपुंजे ठरत असून, चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्याची कोतवालांची मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
महसूल विभागांतर्गत कार्यरत कोतवाल कर्मचाऱ्यांना डाक वितरणासह महसूल प्रशासनांतर्गत विविध कामे करावी लागतात. या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर काम करणाऱ्या कोतवालांना करावयाच्या कामांचा कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे; परंतु कामाच्या मोबदल्यात कोतवालांना दरमहा मिळणारे ७ हजार ५०० रुपये मानधन तुटपुंजे ठरत आहे. यासोबतच चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोतवाल कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, कोतवाल कर्मचाऱ्यांची ही मागणीदेखील अद्याप प्रलंबितच आहे.