पातूरच्या डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये हे ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री बच्चू कडू यांनी उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन सुसज्ज कोविड रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी इमारतीमधील ३५ ऑक्सिजन बेड आणि १५ सामान्य बेडसह कोविड रुग्णांसाठींच्या सोयी सुविधांची आरोग्य यंत्रणेकडून माहिती घेतली.
यावेळी आमदार नितीन देशमुख, कोविड रुग्णालयासाठी इमारत उपलब्ध करून देणारे परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, तहसीलदार दीपक बाजड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव, मुख्याधिकारी सोनाली यादव, पातूर पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, काँग्रेस नेते रामसिंग जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिदायतखा रूमखा, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बोचरे, शिवसेना तालुकाप्रमुख रवी मुर्तडकर, शहर प्रमुख अजय ढोणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या वतीने आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पालकमंत्री बच्चू कडू आणि आमदार नितीन देशमुख यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी डॉ. परिहार, राहुल खंडारे, डॉ. साजिद शेख, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डाॅ. चिराग रेवाळे, कपिल पोहरे, निखिल उपरवट यांनी परिश्रम घेतले.
फोटो:
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा : पालकमंत्री कडू
रुग्णसेवेच्या माध्यमातून माझ्यासारखा कार्यकर्ता घडला. रुग्णांची सेवा केल्यामुळेच आज लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करतो आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, परिचारिकांनी रुग्णांची सेवा करावी. हीच खरी ईश्वरसेवा आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले.