अकोला : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबरदरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या सप्ताहामध्ये योजनेसंबंधी विविध कार्यक्रमांव्दारे जनजागृती मोहीम राबवून जिल्ह्यातील गर्भवती महिलांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संजय खडसे यांनी सोमवारी दिले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, महिला व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक एम. एम. राठोड, जिल्हा कार्यकारी व्यवस्थापक संदीप देशमुख आदी उपस्थित होते.