अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषद इत्यादी पंचायत राज संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही लवकरच ‘कोविड’ची लस देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन ॲप’मध्ये संकलित करण्याचे काम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सध्या लसीकरण सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण आटोपल्यानंतर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांमधील कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यासाठी विभागनिहाय कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन ॲप’मध्ये संकलित करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. माहिती संकलनाचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांच्या कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन ॲप’मध्ये संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
साैरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे लवकरच कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागनिहाय कर्मचाऱ्यांची माहिती ‘कोविन ॲप’मध्ये संकलित करण्याचे काम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सुरू आहे.
डाॅ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.