केंद्रीय शिक्षण मंत्रालय तथा स्वास्थ व कुटुंब कल्याण यांच्याद्वारे आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा २०२०-२१ घेण्यात आली होती.या स्पर्धेत इयत्ता सहावीची कृष्णाई सतीश देशमुखने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटाकावला आहे.
फोटो:
निर्झरी पुंडकर व मंदार चतरकरचे सुयश
अकोला: एमआयटी-डब्ल्यूपीयू विद्यापीठ पुणेद्वारे आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा इन्थुझिया-२०२० मध्ये प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून कथा-कथन स्पर्धेमध्ये प्रभातची निर्झरी पुंडकरने प्रथम क्रमांक तर वाद्यवादन स्पर्धेमध्ये मंदार चतरकार याने तृतीय क्रमांक पटकाविला. नवयुवकांमध्ये कलागुणांना चालना देण्यासोबत त्यांना नैतिक अधिष्ठान मिळवून देण्याच्या उद्देशाने एमआयटी-डब्ल्यूपीयू विद्यापीठ दरवर्षी ‘इन्थूझिया’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे आयोजन करत असते.