डम्पिंग ग्राउंडमुळे रेडवावासी त्रस्त!
बार्शीटाकळी: शहरातील डम्पिंग ग्राउंड रेडवा मार्गाने असल्याने रेडवावासी त्रस्त झाले आहेत. डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. त्यामुळे न.प. याकडे लक्ष देऊन डम्पिंग ग्राउंड हटविण्याची मागणी होत आहे.
----------------------------
निहिदा परिसरातील पुलांची दुरवस्था!
निहिदा: परिसरातील पुलांची दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. निहीदा-बार्शीटाकळी रस्त्यावरील काटेपूर्णा नदीवरील पुलावर कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
------------------------
डॉ.पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी
तेल्हारा: येथील शिवाजी हायस्कूलमध्ये डाॅ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक जितेंद्र देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका शीलाताई वालसिगे, कुसुम वानखडे, श्रीकांत सपकाळ, प्रेरणा कराळे, सरीता खुमकर, मंगला धोटे, विद्या देशमुख, वंदना ताथोड, सुनील वंजारी, अंकेश भांबुरकर, बी.जी.पवार, भारत भोवर, सौजन्य कंकाळे, तेजराव कडू, प्रदीप बोके, गजानन गावंडे, प्रकाश जाधव, उमेश डाबेराव, रोहिणी किरणापुरे, शुभम परघरमोर, सुपेश भटकर, दिशा कलाणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीकुमार सावरकर यांनी केले. (फोटो)
-------------------------------
काळे महाविद्यालयात सरनाईक यांची भेट
बार्शीटाकळी : खडकी येथील पंजाबराव पाटील काळे विद्यालय व पुंडलिकराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, पंंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय येथे अमरावती विभागाचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक यांनी २७ डिसेंबर रोजी भेट देऊन चर्चा केली. यावेळी शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
------------------------
अकोट येथील बसस्थानकात झुडुपे वाढली!
अकोट: शहरातील बसस्थानकात काटेरी झुडुपे वाढल्याने डुकरांचा वावर वाढला आहे. परिणामी, बसस्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकात कचरा सर्वत्र पसरल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे लक्ष देऊन झुडुपे नष्ट करण्याची मागणी होत आहे.
--------------------------
तुरीच्या सोंगणीला सुरुवात!
पातूर: तालुक्यातील ग्रामीण भागात तुरीच्या सोंगणीला सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी तूर सोंगणीच्या कामात व्यस्त असून, मजुरांना रोजगार मिळाला आहे. यंदा ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळ्यांचे आक्रमण झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
--------------------------------
बाळापूर-पारसफाटा रस्त्याची दुर्दशा
बाळापूर: बाळापूर-पारसफाटा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
--------------------------------
टाकळी खुरेशी-नांदखेड रस्त्यावर खड्डेच खड्डे
खिरपुरी: परिसरातील टाकळी खुरेशी-नांदखेड रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. वाडेगाव परिसरातील नागरिकांना अकोला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने या मार्गाने वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
---------------------------------
तेल्हारा शहरात धुळीचे साम्राज्य!
तेल्हारा : शहरातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे, तसेच रस्त्यावर खड्डे असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.