अकोला: मध्यवर्ती कारागृह चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणाºया उड्डाणपुलाचे बांधकाम जोरात सुरू झाले आहे. या उड्डाण पुलासोबत एनसीसी कार्यालयापासून दक्षता नगरकडे जाणार लहान उड्डाण पूलदेखील मंजूर आहे; मात्र या उड्डाण पुलाच्या कामास अजूनही सुरुवात झालेली नाही. बांधकास सुरुवात न होण्याचे कारण शोधले असता, पुरेशा जागेअभावी दुसºया उड्डाण पुलाचे बांधकाम रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दुसºया उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी आता नव्याने डिझाइन तयार करून मंजुरीसाठी पाठविली आहे. मंजुरी आल्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. अकोला शहारात दोन फ्लाय ओव्हर, एक अंडर पासला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात जेल चौक ते रेल्वेस्टेशनच्या उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. स्वाइल टेस्टिंगपासून तर सिमेंट काँक्रिट खांबाच्या उभारणीचे काम ठिकठिकाणी सुरू झालेले आहे. अकोला क्रि केट क्लबपर्यंत उड्डाण पुलाचे बांधकाम अकोलेकरांना दिसत आहे; मात्र एनसीसी आॅफिसपासून तर दक्षतानगरकडे जाणाºया उड्डाण पुलाचे बांधकाम अजूनही सुरू झालेले नाही. या मार्गावर महामार्ग प्राधिकरणास पुरेशी जागा मिळालेली नाही. त्यामुळे या उड्डाण पुलाची रुंदी कमी होत आहे. नाईक हॉस्पिटलसमोर या उड्डाण पुलाचा रम्प टाकण्याची डिझाइन नवीन प्रकल्पाच्या प्रस्तावात आहे. या डिझाइनला मंजुरी मिळताच दुसºया उड्डाण पुलाच्या कामास सुरुवात होणार आहे.अकोला शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवर पर्याय म्हणून उड्डाण पूल बांधण्याचा पर्याय म्हणून दोन्ही उड्डाण पूल मंजूर झाले आहे. १६३.९८ कोटीच्या खर्चातून दोन्ही उड्डाण पुलाचे बांधकाम हरियाणा (हिस्सार) येथील जान्डू कन्सट्रक्शन कंपनी करीत आहे.नव्याने पाठविलेल्या डिझाइनला मंजुरी मिळताच, कंपनी या कामाला सुरुवात करणार आहे. या मार्गावर जागा उपलब्ध नसल्याने काम थांबलेले आहे. त्यामुळे कमी रुंदीचा उड्डाण पुलाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे गेला आहे.- विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख अभियंता, महामार्ग प्राधिकरण, अमरावती.