शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी सुतळीचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 12:08 PM

अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी ५ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांच्या खरेदीला मान्यता दिली आहे.

अकोला: निसर्गाच्या अवकृपेने राज्यातील बळीराजा हवालदिल झाला असतानाच शासकीय धान्य गोदामांमध्ये जमा होणाऱ्या अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी सुतळीचा अभाव असल्यामुळे शासकीय यंत्रणांची कार्यक्षमता चव्हाट्यावर आली आहे. परतीच्या पावसाने शेतमालाची पुरती नासाडी झाली असून, कसेबसे शिल्लक राहिलेले पीक वाचविताना शेतकरी धावपळ करीत आहेत. अशा स्थितीत उशिरा का होईना, अन्न व नागरी पुरवठा विभागाने अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी ५ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांच्या खरेदीला मान्यता दिली आहे.राज्यभरात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी यंदा शेती उत्पादनात वाढ होईल, अशी पिकांची स्थिती होती. यामध्ये ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, भात, धानाचे भरघोस उत्पादन होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान होते. साहजिकच, दिवाळीपूर्वी पिकांची उत्तम स्थिती असल्याने पीक उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात असला तरीही राज्यातील शासकीय धान्य गोदामांमध्ये अन्नधान्याची पोती शिवण्यासाठी सुतळीचा अभाव कसा, असा प्रश्न निर्माण होतो. यादरम्यान, अन्न व नागरी पुरवठा विभागाने पोती शिवण्यासाठी आवश्यक सुतळीच्या खरेदीसाठी आॅनलाइन प्रणालीद्वारे ई-निविदा प्रकाशित केली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ कोटी ८५ लाख ५४ हजार रुपयांतून सुतळीच्या गाठी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२ लाख ७६ हजार किलोची होणार खरेदीराज्यातील काही शासकीय गोदामांमध्ये मशीनद्वारे पोते शिवले जातात, तर ज्या गोदामांमध्ये वीज उपलब्ध नाही, त्याठिकाणी सुतळीद्वारे पोती शिवतात. त्यासाठी २ लाख ७६ हजार १९९ किलो म्हणजेच ५ लाख ५२ हजार ३९८ युनिट्स सुतळीच्या गाठींची खरेदी केली जाईल.

 

टॅग्स :Akolaअकोला