शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चर्चा दोन आमदारांच्या उमेदवारीचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:17 PM

दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार असल्याने वाटाघाटीत यापैकी एक जागा जरी सेनेला मिळाली तर विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचे काय, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.

- राजेश शेगोकार

अकोला: भाजपा-शिवसेना उमेदवारीचे आता फायनल ‘ठरलंय’ असेच संकेत राज्य स्तरावरील घडामोडींवरून मिळत आहेत. त्यामुळे युती झाल्यास कोणत्या पक्षाला कोणत्या जागा, याची चर्चा सुरू झाली असून, त्याला अकोलाही अपवाद नाही. अकोल्यात मात्र शिवसेनेच्या दोन जागांच्या दावेदारीला भाजपाने जिंकलेल्या जागांचा अडसर आहे. सेनेला बाळापूर हवा आहे. त्यासोबतच उरलेल्या चार मतदारसंघांपैकी अकोट किंवा मूर्तिजापूर यापैकी एक जागा सेनेलाच मिळावी, असा आग्रह पक्षाकडून धरला जात आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार असल्याने वाटाघाटीत यापैकी एक जागा जरी सेनेला मिळाली तर विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचे काय, याचीच चर्चा आता रंगू लागली आहे.अकोल्यातील अकोट व बाळापूर हे सध्या सर्वाधिक चर्चेचे मतदारसंघ आहेत. अकोटची जागा २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकली होती. २०१४ ला शिवसेना, भाजपा स्वतंत्र लढल्यावर सेनेला हा मतदारसंघ टिकविता आला नाही व भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवित स्थानिक नेतृत्वाला मोठी चपराक दिली. आ. भारसाकळे हे ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांना पंचायत राज समितीचे अध्यक्षपदही दिले; मात्र ते दर्यापूरचे आहेत, स्थानिक नाहीत, असा प्रचार अलीकडच्या काळात जोरात सुरू झाला आहे. भाजपामधील कार्यकर्त्यांचा एक गटही त्यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे भांडवल शिवसेनेकडून केल्या जात आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कापून ही जागा सेनेला कशी मिळेल, असा प्रयत्न सेनेकडून जोरकसपणे केला जात असल्याचे चित्र अकोट मतदारसंघात आहे. दुसरीकडे आ. भारसाकळे यांचे पक्षात वरिष्ठ पातळीवर चांगलेच वजन असून, नेत्यांशी असलेले संबंधही सौहार्दपूर्ण असल्याने सेनेसाठी त्यांचा मतदारसंघ मिळविणे हे आव्हानच ठरणार आहे.या मतदारसंघासोबतच मूर्तिजापूर मतदारसंघाचीही चर्चा सेनेच्या वर्तुळात जोरात आहे. आ. हरीश पिंपळे नेतृत्व करीत असलेल्या या राखीव मतदारसंघात शिवसेनेने चांगलीच बांधणी केली आहे, तर दुसरीकडे आ.पिंपळे याच्या समोर भाजपानेही पक्षांतर्गत आव्हान उभे करून नव्या नेतृत्वाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. अकोल्यातील खासदार व नामदार अशा दोन्ही गटांसोबत जुळवून घेण्याचा पिंपळे यांचा प्रयत्न असला तरी त्यांच्या विरोधात यावेळी एन्टी इन्कम्बन्सी असल्याचा प्रचार होत आहे. नेमका याचाच फायदा सेनेकडून उचलला जात आहे. ही जागा शिवसेनेला मिळाली तर सेना पूर्ण ताकदीने ही जागा जिंकेल अशी ग्वाही थेट मातोश्रीपर्यंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहचविली आहे. पिंपळे हे सलग दुसऱ्यांदा आमदार असून, त्यांना विधिमंडळ समितीचे अध्यक्षपदही देण्यात आले आहे. त्यामुळे ही जागा भाजपा सहजासहजी सोडण्याची शक्यता कमीच आहे.या पृष्ठभूमीचा विचार केला तर भाजपाला बाळापूर हा मतदारसंघ सेनेला सोडणे सहज शक्य आहे; मात्र अकोट व मूर्तिजापूर हे विधानसभा मतदारसंघासाठी मोठी कसरत होणार आहे. या दोन्ही आमदारांची क्षमता व वरिष्ठ नेत्यांसोबत असलेले संबंध पाहता यांची उमेदवारी कापण्याचे मोठे आव्हान पक्षासमोरही राहणार असल्याने सेनेच्या पदरी निराशाही पडण्याची शक्यता आहे. या सोबतच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे वजन कोणाच्या पारड्यात पडते, यावरही या दोन मतदारसंघाचे भविष्य अवलंबून राहणार आहे. सध्या तरी केवळ जर-तरच्या स्वरूपात चर्चा सुरू असून, त्यामुळेच राजकारण तापत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण